जुळ्या कामगारांचे आगळे रेस्टॉरंट

moscow

मास्को – आपल्यासारख्या चेहर्‍याचे जगात आणखी कुणी असेल का याचे कुतुहल माणसांना नेहमीच वाटत असते. असेही सांगितले जाते की परमेश्वर एक सारख्या चेहर्‍याच्या पाच व्यक्ती जगात जन्माला घालतो. हे खरे असेल तर आपल्यासारखेच दिसणारे आणखी चारजण असणार. पण ते आपल्याला प्रत्यक्षात दिसणार कधी ना ! अर्थात आयडेंटिकल ट्विन याला अपवाद म्हणावी लागतील.

मात्र अशी एकसारखी दिसणारी माणसे तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायची असतील तर त्यासाठी मास्कोची सफर करावी लागेल. तेथील ट्विन स्टार नावाचे रेस्टॉरंट तुमची ही मनीषा पूर्ण करण्यास तप्तर आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी निवडताना खास निकष लावून निवडले जातात. तो म्हणजे त्यांना जुळे भावंड असले पाहिजे आणि ते दोघेही दिसायला अगदी सारखेच असले पाहिजेत. विशेष म्हणजे या मुळे येथे येणार्‍या ग्राहकांचे नाही म्हटले तरी मनोरंजन होतेच कारण येथे प्रत्येक जण जुळा आहे.

रेस्टॉरंटची मालकीण अलेक्सी कोडकोव्हस्की सांगते की १९६४ साली तिने जुळ्यावरचा एक सिनेमा पाहिला होता व त्यावरून असे जुळे कर्मचारीच कामाला असतील असे रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना तिला सुचली. अर्थात एकसारखे दिसणारे, हॉटेलमध्ये काम करण्यास तयार असणारे कर्मचारी मिळणे फारच अवघड आहे पण अलेक्सीला मात्र त्यासाठी वणवण करणेही मान्य आहे.

Leave a Comment