चिमुटभर मीठ मुठभर मास

मीठाचे आपल्या आरोग्यातले प्रताप आपण अनेकवेळा ऐकले आहेत. जादा मीठ खाल्ले तर उच्च रक्तदाब वाढतो, पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते असे आपण जाणतोच पण हेच मीठ आपल्यात लठ्ठपणा वाढवण्याचेही काम करीत असते. हे आपल्यासाठी नवे आहे पण आता असे दिसून आले आहे की, आहारातले मीठाचे वाढते प्रमाण इन्शुलीनचे संतुलन नाहीसे करते, ब्लड ग्लुकोजची पातळी वाढवते आणि शेवटी परिणाम होता तो जाडी आणि वजन वाढण्यावर. सध्या शहरांतल्या लोकांत लठ्ठपणा वाढत आहे. दर तीन माणसामागे एकजण मर्यादेपेक्षा अधिक लठ्ठ आहे. याची कारणे शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले पण आजवर सारे तज्ञ लोक त्याच त्या कारणांजवळ येऊन थांबत होते.

साखर खाणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव या गोष्टी लठ्ठपणाला कारणीभूत आहेत असे पक्के समजले जात होते. त्यापेक्षा अधिक कारणांचा शोध घेतलाही जात नव्हता पण आता या जाडीच्या कारणांत मीठाचाही समावेश झाला आहे. शहरातल्या लोकांच्या आहाराच्या काही खास सवयी त्यामागे आहेत. असे दिसून आले आहे की मसालेदार पदार्थ खाण्यातून नकळतपणे पोटात मीठ जाते.

विशेषत: तयार खाद्यपदार्थांत मीठ अधिक वापरले जाते. कारण ते खाद्यपदार्थ अधिक काळ टिकावेत अशी त्यांच्या उत्पादकांचे इच्छा असते. या पदार्थांत अन्य काही प्रिझर्व्हेटिव्हज वापरलेले असतातच पण मीठाचाही समावेश अधिक केलेला असतो. कारण मीठ हेही एक प्रिझर्व्हेटिव्हच असते. या मीठामुळे शहरातल्या लोकांत जाडी वाढलेली असते असे नवे संशोधन समोर आले आहे. हे संशोधन जपानमध्ये करण्यात आले असून ते जर्नल ऑङ्ग हायपरटेन्शन या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. आपल्या शरीराला सोडियमची गरज असतेच पण, ते प्रमाणात असेल तरच त्याचा ङ्गायदा होतो. ते आपल्याला मिठातून मिळते.

पण आपल्या पूर्वजांनी मिठाच्या बाबतीत अती वर्ज्य करा असा संदेेश दिला आहे. मीठ चवीपुरतेच वापरावे, ते जास्त झाले तर अन्न पदार्थांचे काहीच्या काही होते हे आपण जाणतोच पण आता केवळ पदार्थाचेच नाही तर सगळ्या आरोग्याबरोबर आपले वजन वाढून अनेक नवे प्रश्‍न निर्माण होतात असे दिसून आले आहे. तेव्हा वजन कमी करताना ङ्गॅटस् सोबत मीठावरही नजर ठेवणे आवश्यक झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment