ऑस्ट्रेलियात सापडली डॉल्फिनची नवी प्रजाती

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनारयाजवळ हंपबॅक डॉल्फिनची नवी प्रजाती अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री व वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या संशोधकांना आढळली आहे. या प्रकारातील ही चौथी प्रजाती असून तिचे नामकरण अद्याप केले गेलेले नाही. या प्रजातीच्या डॉल्फिनना कल्ल्यांच्या खाली कुबडासारखा आकार असतो व म्हणून त्यांना हंपबॅक असे म्हटले जाते.

ऑस्ट्रेलियात सापडलेल्या प्रजातीचे डॉल्फिन गडद राखाडी , गुलाबी व पांढर्‍या रंगाची असून त्यांची लांबी साधारण आठ फूट आहे. अशाच प्रकारचे हंपबॅक डॉल्फिन पॅसिफिक पासून हिंद महासागरातही सापडतात. ही सस्तन जात लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी विशेष संशोधन केले जात होते.

संशोधन डॉ. मार्टिन मेंडीज म्हणाले की या प्रकारच्या तीन जाती आत्तापर्यंत ज्ञात होत्या. पैकी एक अंटलांटिक महासागराच्या पूर्वेल आढळते.तिला अटलांटिक हंपबॅक म्हणून ओळखले जाते. बाकी दोन पॅसिफिक व हिंद महासागरात आढळतात त्यांना इंडो पॅसिफिक व पॅसिफिक इंडो असे त्यांच्या स्थानावरून संबोधले जाते. आता चौथी जात ऑस्ट्रेलियात सापडली आहे.

Leave a Comment