वेस्ट इंडीज टेस्ट साठी टीम इंडियाची आज निवड

मुंबई- विंडीजविरूद़धच्या कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. आगामी काळात होत असलेल्या वेस्ट इंडीज विरूदधच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची मुंबईत होणा-या या बैठकीत संदीप पाटील निवड करणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाचे बॉलर्सची कामगिरी निराशाजनक दिसत होती. कांगारूंना वनडे सामन्याित रन्सची त्यांनी खिरापतच वाटली. याची शिक्षा बॉलर्संना मिळणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. कारण वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज केली जाणार आहे.

एकीकडे ईशांत शर्माचं काय होणार हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे झहीर खान आणि उमेश यादव फिट झाले आहेत. नागपूर वन-डे मॅचमध्ये विजयी शिखर गाठल्यानंतर धोनी बोलत होता. बॉलर्संचा फॉर्म सध्या खराब आहे. मात्र कोणत्याही नव्या नियमाचं पालनं बॅट्समन पेक्षा बॉलर्स लगेच करतात. त्यामुळे आता वेस्ट इंडीजसोबत होणा-या टेस्ट सीरिजसाठी कोण-कोणत्या बॉलर्सची निवड होते, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment