पाटणा स्फोट : आणखी दोघांना अटक

पाटणा – गेल्या रविवारी पाटण्याच्या गांधी मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हाती घेतली असून या संदर्भात बिहार आणि झारखंडमध्ये दोघांना संशयित म्हणून अटक केली आहे. या संबंधात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी ऐनुल तारीक हा या स्ङ्गोटात जखमी झाला असून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची जगण्याची शक्यता ङ्गार कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या संबंधात इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या इम्तियाज अन्सारी याचा नजिकचा सहकारी तबीश नियाज उर्ङ्ग अर्शद अन्सारी याला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला बिहारच्या चंपारण्य जिल्ह्याच्या अलौला या गावी अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गांधी मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अटक करण्यात आलेला आरोपी उजैर अहमद हा असून त्याला रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाटण्यातील या स्ङ्गोटाची चौकशी आता एनआयएकडून केली जाईल अशी घोषणा केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्राला तशी विनंती केली, ती केंद्राने मान्य केली आहे असे श्री. शिंदे म्हणाले.