नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अरुप रहा यांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारतर्ङ्गे करण्यात आली आहे. मिग-२९ या बनावटीच्या विमानाचे अनुभवी आणि तज्ज्ञ पायलट म्हणून अरुप रहा हवाई दलात ओळखले जातात. ते ३१ डिसेंबर रोजी नव्या पदाची सूत्रे हाती घेतील आणि एअर चीङ्ग मार्शल बनतील. मावळते हवाईदल प्रमुख एअर चीङ्ग मार्शल एन.ए.के. ब्राऊन यांची जागा ते घेतील.
एअर मार्शल अरुप रहा हे १९७४ साली भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये दाखल झाले. ते हवाई दल प्रमुख म्हणून तीन वर्षे कार्यरत राहतील. त्यांच्याच कार्यकाळात भारतीय हवाईदल ङ्ग्रान्सकडून १२६ लढाऊ जेट विमाने खरेदी करत आहे. भारताच्या इतिहासातील विमानांची ही सर्वात मोठी खरेदी समजली जाते.
एअर मार्शल अरुप रहा यांनी आजवर अलाहाबादच्या सेंट्रल एअर कमांडचे आणि दिल्लीच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या खात्यात ३ हजार ४०० तास विमान उड्डाण करण्याचा अनुभव जमा आहे. ऑपरेशन पराक्रम या मोहिमेमध्ये त्यांनी भटिंडा येथील एअर ङ्गोर्स स्टेशनचे पूर्ण नियंत्रण केलेले आहे.