मुंबई – ऑगस्टमध्येच आपल्या जनता पक्षाचे विलीनीकरण करून भाजपत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांना मुंबईच्या उत्तरपूर्व मतदारसंघातून भाजपतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या जागेसाठी भाजपचे किरीट सोमय्याही इच्छुक आहेत मात्र स्वामी सोमय्या यांच्यापेक्षा प्रबळ उमेदवार असल्याने ही जागा त्यांना दिली जाईल असे सांगितले जात आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्याकडे आहे.
सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या संदर्भात पक्ष सांगेल ते ऐकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी मुंबईच्या घाटकोपर भागात घर घेतले असल्याचे समजते. स्वामी यांनी यापूर्वीही मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे १९७७ व १९८० असे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ते नवे उमेदवार नाहीत असे भाजपच्या वरीष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. स्वामींना येथून तिकिट दिले गेले तर किरीट सोमय्या यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असेही संकेत मिळत आहे. सध्या ही जागा कॉंग्रेसचे संजय निरूपम यांच्याकडे आहे.