पिसाचा झुकता मनोरा पुन्हा होतोय सरळ

पिसा – जगातील सात आश्चर्यात नोंद झालेल्या पिसातील कलता मनोरा पुन्हा मूळ स्थितीत येऊ लागला आहे. झुकता मनोरा पुन्हा सरळ होणे ही आर्श्चयाची बाब नाही तर त्यामागे केली कित्येक वर्षे चाललेला आणि यशस्वीपणे पूर्णत्वास गेलेला रिस्टोरेशन प्रकल्प आहे. २००१ सालीच हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे मात्र त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
Bend-tower2
५६ मीटर उंचीचा हा बेल टॉवर वर्षाला १ मिलीमीटरने झुकत चालला होता. या मनोर्‍याचे बांधकाम २०० वर्षे सुरू होते. १३५० ते १९९३ या कालात तो सुमारे साडेचार मीटरने झुकला होता. १४५० टन वजनाचा हा टॉवर त्यामुळे कोसळण्याच्या अवस्थेत जाऊ लागला होता.

Bend-tower1

सरकारने याची त्वरीत दखल घेऊन टॉवर कलण्यापासून थांबविण्यासाठी खास प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला मात्र या काळात टॉवरच्या पायाची डागडुजी केली गेली. तेथे साठलेले पाणी बाहेर काढले गेले व टॉवरच्या पायाला सपोर्ट देण्यासाठी लोखंडी केबलचे जाळे घालण्यात आले. यासाठी २४६ कोटी रूपये म्हणजेच २५ दशलक्ष पौंड खर्च करण्यात आला.
Bend-tower
या रिस्टोरेशन कामाचा चांगला उपयोग झाला व २०१३ पर्यंत हा मनोरा ३८ र्सेमीने सरळ झाला असल्याचे वैज्ञानिक समितीने केलेल्या पाहणीत दिसून आले. हा मनोरा पुन्हा पहिल्यासारखा ताठ होऊ शकेल असा संशोधकांचा दावा आहे. पिसाच्या या मनोर्‍याला दरवर्षी ६० लाख पर्यटक भेट देतात व त्यातील निम्मे पर्यटक या आठ मजली टॉवरवर जाता यावे यासाठी तिकीटे घेतात असे सांगितले जाते.

Leave a Comment