करिनाला लंडनमध्ये मिळाले सोनेरी मानपत्र’!

लंडन – बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आला आहे. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीने भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आले.

कलाक्षेत्रात करिनाने दिलेल्या योगदानाची दखल ब्रिटन निवासी आशियाई नागरिकांच्या या वृत्तपत्राने घेतली आहे. पुरस्कार स्वीकारताना यूके हे आपल्या आवडत्या स्थळांपैकी एक असल्याचे बेबो म्हणाली. आपली आजी ब्रिटिश होती, तसेच सासरे नवाब पतौडी हे ऑक्सफर्ड क्रिकेट संघाचे कॅप्टन होते याची आठवणही तिने करून दिली.

33 वर्षीय करिना कपूर-खानला नुकतेच हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सन्मानित करण्यात आले. करिनासोबतच गायल किम्बरले वाल्श आणि जादूगार डायनमो यांनाही गौरवण्यात आले. कभी खुशी कभी गम, ओंकारा, जब वी मेट, थ्री इडियट्स आणि बॉडीगार्ड सारखे अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत.

Leave a Comment