स्पेनने पाठवली अमेरिकेला नोटीस
माद्रिद – फ्रान्स आणि जर्मनीच्या पाठोपाठ आता स्पेन या युरोपियन देशाने अमेरिकेने केलेल्या हेरगिरीबद्दल कान उघडणी केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोईस हॉलांद,जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यापाठोपाठ आता स्पेनने अमेरिकेला त्यांच्या कृष्णकृत्याचा जाब विचारला आहे.अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एसएसए) स्पेनमधील 60 लाख नागरिकांच्या मोबाइलवरील संभाषणावर पाळत ठेवलेली आहे.
स्पेन सरकारने सोमवारी अमेरिकेच्या राजदूताला याबाबत जाब विचारणारी नोटीस पाठवली आहे.एल पैस आणि एल मुंडो या स्पॅनिश वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार 10 डीसेंबर 2012 ते 8 जानेवारी 2013 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने स्पेमधील लाखो नागरिकांच्या मोबाइल संभाषणासह टेक्स्ट मेसेज आणि इमेल्सवर पाळत ठेवली होती. मात्र एसएसएने या संभाषणातील कंटेट संकलित केलेला नसून मोबाइल नंबर्स आणि फोन करणा-यांची लेकेशन्स जाणून घेतलेली आहेत. जर्मन आणि फ्रेंच प्रसारमाध्यमांनी अमेरिकेने केलेल्या हेरगिरीचा निषेध करायला प्रारंभ केल्यानंतर स्पॅनिश प्रसारमाध्यमांनीही आता जाहीरपणे अमेरिकेवर टीकास्त्र सोदले आहे.