नवी दिल्ली – कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पक्षकार बनवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यालयाने मंगळवारी फेटाळून लावली. कोळसा घोटाळा प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पंतप्रधानांना कोणतेही निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या घोटाळयाचा तपास सुरु असून, यात सीबीआय निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने कोळसा घोटाळयाचा तपास करणा-या टीममध्ये आणखी एका अधिका-याचा समावेश करण्यास सीबीआयला परवानगी दिली. सीबीआयचे 39 जणांचे पथक कोळसा घोटाळा प्रकरणाचा तपास करत आहे. तपास करणा-या पथकामध्ये कोणाताही बदल करु नका असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत त्यामुळे नव्या अधिका-याचा समावेशाच्या परवानगीसाठी सीबीआयने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.