औदासिन्यावर जालीम उपाय : फोटो

कधी कधी आयुष्यात नैराश्याचे प्रसंग येतात, धावपळ वाढते. आपल्या आयुष्याचे नेमके उद्दिष्ट काय आहे याविषयी आपल्याच मनात संभ्रम निर्माण होतो. अशावेळी आपला डिस्मूड होतो. मात्र आपली मन:स्थिती पुन्हा वळणावर आणायची असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपले स्वत:चेच जुने ङ्गोटो पाहणे. त्यामुळे मनावर आलेले मळभ दूर होते, असा अनुभव आहे. अनेक लोक असा मूड यावा यासाठी इंटरनेटशी खेळत बसतात, ङ्गेसबुकवरून कोणाशी तरी संपर्क साधतात आणि आपण आपल्या मित्रांच्या संपर्कात आनंदी होतो अशी स्वत:च्या मनाशी समजूत घालत बसतात. परंतु मनाची अवस्था बदलण्याचा हा काही १०० टक्के निर्दोष असा मार्ग नाही. त्याऐवजी स्वत:चे जुने फोटो पहायला लागलो की, आपण लहानपणी कसे होतो? त्या फोटोत आपण कसे कपडे घातलेले आहेत? त्या काळात ङ्गॅशन कशी होती? इत्यादी जुन्या आठवणी जाग्या होतात.

आपण दहा वर्षांपूर्वी किंवा वीस वर्षांपूर्वी खरेच कसे वेगळे दिसत होतो हे बघून आपलीच कळी खुलते. कधी तरी आपल्या त्या ङ्गोटोचा इतिहास आपल्या आईने किंवा वडिलांनी आपल्याला सांगितलेला असतो. तो फोटो कोणत्या अवस्थेत काढला? त्याला निमित्त काय घडले? अशा सगळ्या गोष्टी त्या फोटोशी निगडित असतात. त्यामुळे जुना अल्बम बघायला लागलो की तो सारा इतिहास, त्या सार्‍या आठवणी जाग्या होतात. वर्तमानाचा विसर पडतो. वर्तमानातील ज्या घटनांमुळे मनात उदासीनता दाटून आलेली असते ती दूर होते आणि मन प्रसन्न होऊन जाते. माणसाच्या आयुष्यामध्ये मी सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे त्या मी शी संबंधित जे जे काही असते ते सारे आपल्या जिव्हाळ्याचे असते. त्यातले जे चांगले असते ते आपल्या मनाला सुखावणारे असते. म्हणून त्या आठवणी आपल्या मनाची कळी खुलवतात.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टस्माऊथस् स्कूल ऑङ्ग कॉम्पिटिंग या संस्थेने आपल्या जुन्या फोटोचे आपल्या मनावर होणारे परिणाम पाहणीअंतीशोधून काढले आहेत. विशेषत: असे फोटो ऑनलाईन बघणे अधिक सोपे असते. त्यामुळे लोकांनी आपले फोटो फेसबुकवर टाकावेत, असे आवाहन करण्यात आले आहे आणि गेल्या काही वर्षात दरमहा ८५ कोटी नवे फोटो अपलोड केले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *