सचिन तेंडूलकरचा रणजीमधील शेवटचा दिवस

मुंबई : रणजी क्रिकेटमध्ये मंगळवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा दिवस आहे. या सामन्यांनतर तो रणजी क्रिकेटमधून निवत्तीि घेणार आहे. त्या मुळे सर्व जणांचे त्यांच्या शेवतच्या दिवशाच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई आणि हरयाणा संघात सुरु असलेल्या रणजी सामन्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. हरयाणाच्या संघाने दुस-या दिवसअखेर मुंबईवर २२२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही आघाडी मोडून मुंबई संघाला विजय प्राप्त करन्याचा प्रयत्न करनार आहे. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकण्यायसाठी दमदार फलंदाजी करावी लागणार आहे.

मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर तिस-या दिवशी फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरेल.
पहिल्या डावात धावा काढणा-या सचिनला मोहित शर्माने त्रिफळाचित केले होते. त्यामुळे मंगळवारी सचिनची बॅट काय कमाल करणार याकडे सर्वांची नजर लागली आहे. मुंबईला हा सामना जिंकून देण्या त सचिनचा कितपत हातभार लागतो हे पाहणे औत्‍सुक्याचे ठरेल.

Leave a Comment