माधुरी दीक्षित करणार रणवीर सिंहच्या आईचा रोल

बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सिल्वर स्क्रीन वर आता रणवीर सिंहच्या आईचा रोल करणार आहे. सध्या याचीच बॉलीवुडमध्ये जोरदार चर्चा आहे. जोया अख्तर आगामी काळात एका सिनेमाची निर्मिती करीत असून हा सिनेमा बहिण–भावांच्याय संबधावर आधारित आहे. या सिनेमाची घोषण आता लवकरच केली जाणार आहे.

सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात येत असलेल्या सिनेमासाठी जोयाने भावाच्या रोलसाठी अभिनेता रणवीर सिंहच्या बहीणीच्या रोलसाठी प्रियंका चोप्राची निवड केली आहे. या दोघांनी या रोलसाठी होकार दर्शविला आहे. रणवीर सिंहच्या आईच्या भूमिकेसाठी जोया अख्तरने बॉलीवुडमधील काही दिग़गज अभिनेत्रिशी संबध साधला आहे.

जोयाने या रोलसाठी माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि डिंपल कपाड़ियाशी चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात रणवीर सिंहच्या आईचा रोल कोण करणार याबाबत उत्सुकता लागली आहे. माधूरी दीक्षितचे नाव फायनल झाले असे म्हटले जात असले तरी तिने या रोलसाठी होकार दर्शविला नाही. जोयाने रणवीर सिंहच्या अपोजिट अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्राच्या‍ अपोजिट फरहान अख्तरची निवड केली असल्याचे समजते.

Leave a Comment