
सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या विरोधात ध्वनी प्रदूषण केल्याची याचिका दाखल झाली आहे. खरे म्हणजे आपल्या आसपास अनेक प्रकारांनी ध्वनी प्रदूषण होत असते. परंतु काही लोकांना केवळ शिवसेनेचा आवाजच ऐकायला नको वाटतो. शिवसेना प्रमुखांचे भाषण सुरू झाले की त्यांचे कान आणि मन दोन्ही विटून जाते आणि असे लोक शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे ध्वनी प्रदूषण झाल्याचे आकांडतांडव करून उच्च न्यायालयात धाव घेतात. गेल्या काही वर्षापासून अशा लोकांनी शिवसेनेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून शिवसेनेला त्रस्त करून सोडले आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेऊन या याचिकेतल्या मागणीनुसार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करून सभा घेतल्या जातात, धार्मिक प्रार्थना केल्या जातात, मिरवणुका काढल्या जातात एवढेच नव्हे तर बारशापासून ते मयतापर्यंत सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ध्वनीवर्धक लावले जातात. परंतु अलीकडच्या काही वर्षामध्ये काही कार्यकर्ते केवळ शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या विरोधात सातत्याने जनहित याचिका दाखल करताना िदसत आहेत.
काही जनहित याचिकांमुळे सरकारला काही कायद्यात बदल करावे लागले आहेत, तर काही कायदे नव्याने करावे लागले आहेत. त्यामुळे जनहित याचिकांचे स्वागत केले पाहिजे. परंतु त्या याचिकांचा हेतू स्वच्छ असला पाहिजे. बहुतेक असे लोक या अधिकाराचा वापर काही विशिष्ट लोक द्वेषभावनेतून काही विशिष्ट विचाराच्या लोकांना त्रस्त करण्यासाठीच करतात असा अनुभव आहे. म्हणजे त्यांचा या अधिकाराचा वापर सोयीस्कर पद्धतीने केला जातो. काही कार्यकर्ते केवळ भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना अशा हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करून जनहित याचिका दाखल करत असतात. या जनहित याचिका दाखल करणार्या कार्यकर्त्यांना केवळ हिंदुत्ववाद्यांनाच डिवचायचे असते. अशाच एका जनहिताची काळजी घेणार्या कार्यकर्त्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दसरा मेळाव्यामध्ये ध्वनीवर्धकाचा आवाज ङ्गार वाढलेला होता, त्यामुळे ध्वनीप्रदूषण झाले. पर्यायाने शिवसेनेला दंड ठोठवावा, असा या याचिकेचा मतितार्थ आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दरवर्षी ध्वनीप्रदूषणाची जोरदार चर्चा केली जाते. कधी कधी या मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कचे मैदान शिवसेनेला देऊ नये, अशाही हालचाली होतात.
२०१२ साली तर परवानगी नाकारण्यात आली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची ४७ वर्षांची परंपरा आहे, तिला ध्वनीप्रदूषणाच्या बहाण्याने खंडित करण्याचा प्रयत्न होतो. ध्वनीप्रदूषण होऊ नये असे कोणीही म्हणेलच. परंतु शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केवळ भाषण केले जाते आणि भाषणाच्या आवाजाने ध्वनीप्रदूषण किती प्रमाणात होऊ शकते याला काही मर्यादा आहे. लोकांच्या कानाचे पडदे ङ्गाटतील एवढा तरी आवाज भाषणामुळे नक्कीच होत नसतो. पण गेल्या चार-पाच वषार्र्ंपासून शिवसेना मेळाव्यातल्या ध्वनीप्रदूषणाची हटकून चर्चा केली जाते आणि या प्रदूषणाच्या निमित्ताने एखादी तरी स्वयंसेवी संघटना न्यायालयात धाव घेते. या संघटनांना ध्वनीप्रदूषणाचे खरोखरच वावडे असेल तर त्यांनी इतरही अनेक ठिकाणच्या ध्वनीप्रदूषणाची दखल घेऊन त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घ्यायला हवी. त्यांना जनहित याचिका दाखल करण्याची हौस भागवता येईल एवढे कार्यक्रम केवळ दसर्यालाच नव्हे तर दररोज साजरे होत असतात. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव आणि अशा प्रकारचे कितीतरी उत्सव आणि समारंभ धुमधडाक्याने प्रचंड आवाजाच्या वातावरणात साजरे केले जातात. त्यात सर्व जातीधर्मांच्या लोकांचा सहभाग असतो. अशा कार्यक्रमांच्यामुळे जे ध्वनी प्रदूषण होते ते ध्वनी प्रदूषण शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षा घातक असते. परंतु त्यांच्या विरोधात कोणती संघटना कधी न्यायालयात जात नाही.
कित्येक कार्यक्रम तर विलक्षण दणदणाटात होत असतात.
मुंबईत विसर्जन मिरवणुका निघतात आणि त्यांच्या समोर वाजणारी वाद्ये सारे पहात असते आणि ऐकतही असते. त्यातल्या एकातरी मिरवणुकीतला आवाज या जनहित याचिकावाल्यांना अस्वस्थ का करत नाही? त्यांचा डोळा केवळ दसरा मेळाव्यावरच का असतो? येनकेन प्रकारेण शिवसेनेची सतत खोडी काढत राहणे हाच त्यांचा धर्म आहे की काय असा प्रश्न काहीवेळा पडतो. कोणताही राजकीय विचार सर्वस्वी ग्राह्य किंवा सर्वस्वी त्याज्य नसतो. प्रत्येक विचाराचे आपले एक वैशिष्ट्य असते आणि ते त्या त्या संघटनेच्या समर्थकांना आवडत असते. परंतु एखादा विचार आपल्याला आवडत नसला तरी त्याचा आदर केला पाहिजे. तो विचार मांडणार्याला तो मांडण्याचा अधिकार असतो. तो आपण मान्य केला पाहिजे. त्याच्यावर काही प्रतिवाद करता येत असेल तर तो जरूर केला पाहिजे. परंतु कोणाच्या तरी विचार मांडण्याच्या कार्यक्रमात अडथळे आणणे ही काही लोकशाहीतली रीत नाही. ज्या लोकांना दुसर्याचे विचार खोडता येत नाहीत ते लोक अशा मार्गाने विचारांचा विरोध करत असतात. त्यामुळे दसर्या मेळाव्याच्या विरोधात दाखल होणार्या अशा प्रकारच्या या सगळ्या याचिका हा एक खोडसाळपणाचा प्रकार वाटतो. मात्र अशा याचिका दाखल करणारे लोक न थकता दरसाल त्या दाखल करत राहतात.