मुजफ्फरनगर दंगलीचा बदला घेण्यासाठी बाँबस्फोट

पाटणा – मुजफ्फरनगर दंगलीचा बदला घेण्यासाठीच पाटणा येथील सभास्थळी बाँबस्फोट घडवण्यात आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन झाले आहे. सध्या भारतीय तपास यंत्रणांच्या अटकेत असलेल्या यासीन भटकळचा जवळचा साथीदार तहसीन उर्फ मोनू अख्तर हा या बाँबस्फोटांचा मास्टरमाईंड असल्याचे वृत्त आहे.

रविवारी पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांची हुंकार रॅली होती. मात्र सभेला काही तासांचा अवधी शिल्लक असताना गांधी मैदान व पाटणा स्थानक येथे बाँबस्फोट झाले व यात सहा जणांचा मृत्यू झाला. बिहार पोलिसांनी बाँबस्फोटांचा तपास करण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले. यात इम्तियाज नामक दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

इम्तियाजने पोलिस चौकशीत पाटणा स्फोटाप्रकरणी महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.काही महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरमधील दंगलींचा बदला घेण्यासाठी हे बाँबस्फोट घडवण्यात आल्याचे इम्तियाजने पोलिसांना सांगितल्याचे समजते. बाँबस्फोट घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी सात टीम तयार केल्या होत्या. प्रत्येक टीमने गांधी मैदानात एक-एक बाँब पेरल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment