माधुरी डान्स अॅकॅडमी आता मोबाईलवरही

मुंबई – नृत्याची आवड आहे, नृत्य शिकायचे आहे पण प्रत्यक्ष क्लास मध्ये जायला वेळ नाही अशी अनेकांची समस्या असू शकते. पण आता डान्स तुम्हाला घरबसल्या अथवा तुम्ही असाल तेथे, तुम्हाला हव्या त्या वेळात शिकता येणार असेल व तो खुद्द माधुरी दीक्षितकडून शिकता येणार असेल तर? ही संधी आपली डान्समास्टर माधुरी दीक्षित नेने हिने आपल्या शिष्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे डान्स वुइथ माधुरी या अॅपच्या सहाय्याने. आयओएस व अॅड्रईड ऑपरेटिग सिस्टीम असलेल्या कोणत्याही मोबाईल हँडसेट व टॅब्लेटवर हे अॅप उपलब्ध आहे.

या विषयी बोलताना माधुरी म्हणाली की या अॅपमुळे जगभरातून कुठूनही नृत्यप्रेमी आपला नृत्याचा छंद जोपासू शकतात, डान्स स्टेप करून फिटनेस राखू शकतात तसेच जगभरातील नृत्यप्रेमी सहकार्‍यांबरोबर एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. नृत्यप्रेमी त्यांना सवड असेल तेव्हा व कुठेही असले तरी हा आनंद घेऊ शकणार आहेत. माझ्याकडून व माझ्या सहकार्‍यांकडून थेट शिकवणी घेऊ शकणार आहेत. नृत्य स्पर्धांसाठी तयारीही करू शकणार आहेत. हे अॅप फेब्रुवारीतच आरएनएम मुव्हींग पिक्चर्स तर्फे लाँच केले गेले आहे.

Leave a Comment