पुणे, – वडिलांना फिरायची प्रचंड आवड होती, यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आमची गडकिल्ल्यांची वारी ठरलेली असायची तसेच मोठ्या सुट्ट्यामध्ये देशाच्य कानाकोपर्यात फिरायचो. भटकंती, फोटोग‘ाफी, अभिनय अश्या विविध क्षेत्रामध्येे माझी ओळख निर्माण झालेली असली तरी भटकंती हीच माझी पॅशन आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी शनिवारी केले.
अक्षरधारा, राजहंस प्रकाशनच्या वतीने आयोजीत मायमराठी शब्दोत्सवानिमित्त अनुजा मेस्त्री यांनी गुणाजी यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. लहानपणापासून भटकंतीची सवय असल्याने चित्रपट क्षेत्रापासून मी दूरच होतो, अगदी निवडक हॉलिवुडचे चित्रपट मी पहायचो. भटकंती बरोबर बॅडमिंटन आणि कि‘केटची आवड होती. मात्र एका अपघातात खांदा निखळल्याने या खेळांपासूनमला दूर व्हावे लागले. इंजिनियरींग सुरू असताना काहीतरी वेगळे करायचे म्हणून मी मित्रांच्या आग‘हाखातर मॉडेलिंगकडे वळलो आणि मग मराठी, हिंदी चित्रपट ते हॉलिवुड असा प्रवस करत आहे.
हवाई मुलुखगीरी या पुस्तकाविषयी बोलताना गुणाजी म्हणाले, मी जेंव्हा भटकंतीवर असतो त्यावेळी माझ्यातील विविध गुणांचा एकत्रित वावर सुरू असतो यामुळे फोटोग‘ाफी, गडकिल्ल्यांविषयी लिहिणे या गोष्टीमाझ्या हातून घडत जातात. शब्द भावना उलगडगत जातात, डोंगरदर्यांचे विश्व मला शब्द आणि सुरातून साद घालत मला वेगळी अनुभुती देतात यामुळेच मला भटकंती करताना अचानक कविता सुचतात. गडकिल्ल्यांना मी असं‘य वेळा भेटलो होतो मात्र हवाई मुलुखगिरीच्या निमित्ताने जेंव्हा असमंतामधून मी किल्ल्यांचे दर्शन घेतले ते विलोभनीय आणि नाविन्यपूर्ण होते. चित्रपटांच्या व्यस्त शेड्युलमधूनही मी किमान सहा दिवस राज्याच्या विविध भागातील डोंगरदर्यात फिरत असतो असेही त्यांनी सांगितले.
द किंग आणि साई एकाच वेळी
मॉडेलिंग मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य आणि इतर विविध भाषात 180 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. मला चांगला अभिनय करता येत असावा यामुळे मला हॉलिवुडमध्ये संधी मिळाली असून कामसूत्र 3डी हा बिगबजेट चित्रपट लवकरच जगभर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून यातील मु‘य राजाची भूमिका मी साकारली आहे. विदेशात या चित्रपटाचे शूटिग सूरू असतानाच हिंदीमध्ये साई बाबांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय त्यातही साईबाबांच्या मु‘य भूमिकेत असल्याचे गुणाजी यांनी यावेळी सांगीतले.