बिग बॉसचा माझ्यासाठी शेवटचा सीझन- सलमान

मुंबई- बिग बॉस-७च्या सेटवर सलमान खान रागाला आला होता. रागाच्याा भरात त्याने हा सिझन आपला शेवटचा सिझन असल्याचे जाहीर केले आहे. टीव्हीवरील ‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोचा सलमान खान होस्ट आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेता कुशाल टंडन याने तनिषा मुखर्जी सोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिली असल्याचे समजते.

शोच्या शनिवारी प्रसारीत झालेल्या भागात सलमान खानने कुशालला चांगलेच सुनावले होते. सलमान म्हणाला “तुम्हाला वाटत असेल की या शोमधून गेल्यानंतर तुमची प्रतिमा तुम्ही लगेच सुधारू शकाल, तर हे चुकीचे आहे. आपल्या चुकीच्या वागण्याचा आपल्या प्रतिमेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणामही होतात, मी स्वत: हे भोगले आहे. लोकांच्या मनात त्या गोष्टी कायम राहतात.” या भागामुळे बिग बॉसमध्ये माझा हा शेवटचा सिझन असेल, असंही सलमान म्हणाला.

रविवारी ट्विट करुन सलमानने आपली मतं मांडली. सलमानने आपल्या ट्विटमध्ये लिहील आहे की, “बिग बॉसच्या प्रेक्षकांचे म्हणने आहे की दोन्ही स्पर्धकांना शोमधून बाहेर काढले पाहिजे, मात्र तुम्ही जेवढे बघितले, ऐकले घटना केवळ तेवढी नाही आहे. तुम्ही केवळ एक तासाचा भाग बघता, मात्र मला पूर्ण आठवडाभर सगळेच पाहावे लागते.” जर कोणत्या महिेलेसोबत असा घाणेरडा व्यवहार कोणी करत असेल, तर सर्व स्त्री-पुरुषांनी या विरोधात आवाज उठवायला पाहिजे.

Leave a Comment