फ्रेंच बहुविकलांगाचे एव्हरेस्टवरून यशस्वी स्काय डायव्हिंग

काठमांडू – रविवारी माऊंट एव्हरेस्टवरून यशस्वी स्काय डायव्हिंग करणारी पहिली व्यक्ती बनण्याचा मान बहुविकलांग असलेल्या फ्रान्सच्या ५५ वर्षीय मार्क कोप याने रविवारी मिळविला आहे. गेली दहा वर्षे मेंदूच्या असाध्य रोगामुळे चालणे व बोलणे अशक्य झालेल्या, पाठीचा कणा अतिशय नाजूक अवस्थेत असलेल्या आणि स्नायू कमजोर असलेल्या कोप यांनी हेलिकॉप्टरमधून १० हजार मीटर म्हणजे ३२८०० फुटांवरून त्यांचा स्काय डायव्हर मित्र मारियो याच्यासह एव्हरेस्टवरून आकाशात उडी घेतली आणि जमिनीवर यशस्वी लँडींगही केले. त्यानंतर त्यांना कांही इजा झाली नाही ना हे पाहण्यासाठी काठमांडू मधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या रूग्णालयातूनच बोलताना कोप म्हणाले की मला खूप वेदना होत आहेत मात्र तरीही मी खूपच आनंदी आहे. मला व्हिलचेअर शिवाय हलता येत नाही मात्र हे साहस करण्यासाठी एअर स्ट्रीपपर्यंत पोहोचताना मला घोड्यावर बसून तासन तास प्रवास करावा लागला. हा प्रवास माझ्यासाठी अतिशय वेदनादायी होता. मात्र जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टवरून स्काय डायव्हिंग करण्याचे माझे स्वप्त पुरे झाले आहे. यामुळे माझ्यासारख्या अनेक अपंगांना प्रेरणा मिळावी अशी माझी इच्छा आहे.

Leave a Comment