तिरुवनंतपूरम् – केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी हे राज्याच्या कन्नूर जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांच्यावर विरोधी डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दगडङ्गेक केली. त्यात ते जखमी झाले. या घटनेमुळे कन्नूर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी दगडङ्गेक करणार्या तरुणांना अटक केली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्यात आंदोलन सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत डाव्या पक्षांनी तीव्र आंदोलन उभारले आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून कन्नूर येथे मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या वेळी निदर्शने करण्यात येणार होती, परंतु पोलिसांनी निदर्शकांना मुख्यमंत्री येण्याच्या आधीच अटक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या डाव्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आल्याबरोबर त्यांच्या गाडीवर दगडङ्गेक केली. मुख्यमंत्र्यांच्या मोटारकारची काच बंद होती. परंतु एक दगड काच ङ्गोडून आत आला आणि मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागला.
मुख्यमंत्र्यांनी अशाही अवस्थेत आपला नियोजित कार्यक्रम पार पाडला. जनतेला शांततेचे आवाहन केले. कन्नूर हा जिल्हा डाव्या आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो आणि या जिल्ह्यात डाव्या पक्षांची दहशत असते. आपल्याला या जिल्ह्यातले कॉंग्रेसचे कार्यकर्ते किती प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव आला असे मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यांनी १८ नोव्हेंबरला पुन्हा एकदा कन्नूर येथे येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांवर दगडङ्गेक कशी केली गेली, यावरून पोलिसांवर टीका होत आहे.