कवितेने माणसाचा दृष्टीकोन सकारात्मक होतो.ˆ पाडगावकर

mangesh-padgaokar-28

पुणे – आपल्या आजुबाजूला खूप कोलाहल असून प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या आहेतच. पण या सगळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक करण्याचे काम कविता आणि गाणी करतात. त्यामुळेच मला कविता आणि गाणी म्हणजे आनंदी जीवनासाठीचा ऑक्सिजनच वाटतात, असे मत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावर यांनी व्यक्त केले.

कल्पक, पुणे निर्मित ‘शोध कवितेचा’ या महेश पाटणकर लिखित-दिग्दर्शित कार्यक‘माचा शतकमहोत्सवी प्रयोग पाडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ भावगीत गायक अरूण दाते, महेश पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी मंगेश पाडगावकर यांनी ‘सलाम’, ‘गाणं’ आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या आपल्या कविता सादर करून रसिकांना अनोखी भेट दिली.

आठवणीतील कवितांना संगीत, प्रकाशयोजना आणि नाट्यरूपांतरणाची नेमकी साथ देऊन तयार करण्यात आलेल्या या कार्यक‘माद्वारे रसिकांना ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’, ‘आजीच्या जवळी घड्याळ कसले’, ‘खबरदार जर टाच मारूनी’, ‘श्रावणमासी हर्षमानसी’ ‘पडू आजारी’ यासार‘या अविट गोडीच्या अनेक कविता ऐकायला आणि अनुभवायला मिळाल्या. आठवणींच्या कवितांचे दृक्श्राव्य सादरीकरण असलेला हा कार्यक‘म गौरी गोळे-लिमये, भाग्यश्री भागवत, वंदना जोगळेकर, श्रुती नावडीकर, अनुराधा पाठक, यशश्री पुणेकर, विजय केळकर, धनंजय दीक्षित आदी कलाकारांनी सादर केला. त्यांना सिद्धा पाटणकर, अनिरूद्ध देसाई, श्रीनंद मेहेंदळे, तुलसी पाटणकर, हर्षदा लिमये आणि विकास शिधये हे कलाकार साथसंगत केली.

Leave a Comment