सोनी इंडियाचे यावर्षात ३५०० कोटीं विक्रीचे उदिष्ट्य

जपानच्या इलेक्ट्रोनिक्स कंपनी सोनीने चालू आर्थिक वर्षात त्यांच्या एक्सपिरीया रेंजमधील स्मार्टफोनसाठी  भारतात ३५०० कोटी रूपयांचे स्मार्टफोन विक्रीचे उदिष्ट्य ठेवले असल्याचे जाहीर केले आहे.सोनी इंडियाचे ग्राहक विभाग प्रमुख तदातो किमुरा यांनी ही घोषणा केली.

किमुरा म्हणाले की स्मार्टफोन क्षेत्रात कंपनीने चांगला जम बसविला असून आमचे स्मार्टफोन तेजीत व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आम्ही विक्रीचे जे उदिष्ट्य ठेवले आहे ते सहजी पार करू असा विश्वास आहे. स्मार्टफोन क्षेत्रात कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करत आहे व आमच्या श्रेणीतील उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. या कॅलेंडर वर्षात कंपनीने १२ नवी उत्पादने बाजारात आणण्याचे ध्येय ठेवले होते व त्यातील बरीचशी उत्पादने बाजारात दाखलही झाली आहेत असेही ते म्हणाले.

Leave a Comment