सुष्मिता सेन सोबत डेटिंग करतोय रितिक

माजी मिस यूनिवर्स सिनेअभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या जीवनात आणखीन एक पुरूष आला आहे. सुष्मिता एक रेस्टोरेंट चालविणा-या रितिक भसीन सोबत सध्या डेटींग करत आहे. त्यामुळे आता सुष्मीता याच्या सोबत तरी लग्न करणार की नाही असा प्रश्ना पडला आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार रितिक भसीनच्याल संबधाबाबत नुकतेच सुष्मिताने एका जवळच्या मित्राला कल्पना दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता-रितिक डेटिंग करीत असल्याचे लक्षात आले आहे. सध्या तसे पाहिले तर सुष्मीताकडे कोणताच सिनेमा नाही. त्यामुळे तिला डेटींगसाठी वेळ मिळत आहे.

यापूर्वी सुष्मिताचे नाव माजी क्रिकेटपटू वसीम अकरम व सिनेअभिनेता रणदीप हुड्डा सोबत जोडले गले होते. सुष्मिता सेनचा गेल्या तीन वर्षापासून कोणताच सिनेमा आला नाही. त्यामुळे तीन वर्षापासून सिनेमा नसल्याने बसून आहे. आता लवकरच तिची बॉलवूडमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आगामी काळत ती राजश्री ओझाच्या येत असलेल्या सिनेमात एक्टिंग करताना दिसणार आहे.

Leave a Comment