गुगल गुप्तपणे उभारतेय तरंगते डेटा सेंटर

वॉशिंग्टन – सॅन फ्रान्सिस्कोतील बे ट्रेझर बेटावर सर्च इंजिन जायंट गुगल तर्फे महाप्रचंड डेटा सेंटर उभारले जात असल्याचे वृत्त असून हे डेटा सेंटर तरंगते आहे . त्यामुळे ते पाण्यातून कुठेही नेता येऊ शकणार आहे. गुगलने मात्र या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २००९ सालीच गुगलने असे तरंगते डेटा सेंटर उभारण्याचे पेटंट मिळविले आहे. त्यानुसार या फ्लोटींग डेटा सेंटरची उभारणी सुरू झाली आहे. २५० फूट लांब, ७२ फूट रूंद व १६ फूट खोली असलेल्या एका बार्जवर हे सेंटर कार्गो कंटेनरमधून बांधले जात आहे. हे बांधकाम अतिशय गुप्तपणे केले जात असल्याचेही समजते. चार मजली उंच या सेंटरचे बांधकाम कार्गो कंटेनरपासून होत असल्याने ते थंड ठेवणे सहज सोपे आहे शिवाय त्याला सम्रुद्रापापासून उर्जाही मिळणार असल्याने त्यासाठीचा खर्चही कमी होणार आहे.

ट्रेझर आयलंड संचालकांनी हे हँगर तीन बेट बाय अॅन्ड लार्ज या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगितले आहे.मात्र स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पावर जे कर्मचारी काम करत आहेत, ते त्यांचा खर्च गुगलच्या क्रेडीट कार्डावरच करत आहेत. कदाचित त्यांच्यापासूनही हे काम गुगलसाठीच होत असल्याची बातमी गुप्त ठेवली गेली असावी.