काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटरवरून युद्ध

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलेच ट्विटर वॉर रंगले आहे. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं ते म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार आहेत असे म्हटले आहे. या आरोप- प्रत्युरोपामुळे राजकीय वातवरण मात्र ढवळून निघाले आहे.

सुषमा स्वराज म्हणाल्या, “ दिग्विजय सिंह राहुल गांधींपेक्षा चांगले उमेदवार आहेत.” जवाहरलाल नेहरु सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नव्हते, या मोदींच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करुन टीका केली. ते म्हणाले, “ भाजपाला वाटतं की भारतीय मतदारांनी अशा अहंकारोन्मादी, मनोरुग्ण, खोटारड्याला मत द्यावं”, का? भाजपला चांगला उमेदवार मिळाला नाही, सुषमा स्वराज कुठे कमी आहेत का?

हे पहिल्यांदाच घडलं नाही की दिग्विजय सिंह यांनी सुषमा स्वराज यांची स्तुती केली. याआधी गेल्याल वर्षी दिग्विजय सिंह म्हणाले होते की, पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणे ही सुषमा स्वराज यांचा अधिकार आहे. सुषमा स्वराज त्यावर बोलल्या होत्या की, काँग्रेस नेत्यांना वाद निर्माण करण्याची सवय आहे. एकूणच काय तर मोदी-राहुलवरुन पुन्हा एकदा ट्विटर युद्ध रंगतंय. यामुळे गेल्याच काही दिवसापासून सोशल मीडियाचे महत्त्व या नेत्यांना चांगलंच पटलेले दिसत आहे.

Leave a Comment