पटण्यात आज मोदींची सभा

पाटणा : रविवारी बहुचर्चित बिहार दौ-यावर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येत आहेत. पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी दुपारी दोन वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. जेडीयू एनडीएमधून बाहेर पडल्याने मोदी पहिल्यांदाच बिहारमध्ये येत आहेत त्या मुळे त्यांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सभेत गुजरातचे मुख्यमंत्री मोदी राहुल गांधींबरोबरच जेडीयू आणि नितीश कुमार यांच्याविषयी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे मोदींच्या आधी म्हणजे सकाळी अकराच्या सुमारास राहुल गांधी दिल्लीत सभा घेत आहेत. त्यामुळे या सभेत रा‍हूल गांधी काय बोलणार याला ते उत्तर देणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मोदी व राहुल गांधीं यांच्यात सभेचा सिलसिला जोरात सुरू आहे. दोघांच्या सभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे रविवारी होणा-या सभेतून मोदी हे काय मागदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.