नितीश कुमार संधिसाधू – नरेंद्र मोदी

पाटणा – काही जण सोडले तर, बिहारचे लोक संधिसाधू नाहीत. जे लोक जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहिया यांना सोडू शकतात ते भाजपलाही सोडू शकतात अशा शब्दात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमारांवर नाव न घेता टीका केला.

नरेंद्र मोदी यांनी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानातून हुंकार सभेला संबोधित करताना नितीश कुमारांवर जोरदार टीका केली. मोदींनी नितीश कुमारांवर भाजप आणि बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. बिहारचा विकास भाजपनेच घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदींच्या या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. दरम्यान मोदींच्या सभेपूर्वी पाटण्यामध्ये रविवारी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. म्बस्फोटांमध्ये ५ जणचा मृत्यू झाला तर, आठ जण जखमी झाले. नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी झालेले बॉम्बस्फोट हे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Leave a Comment