कोळसा खात्यात माङ्गिया कार्यरत : मंत्र्यांची कबुली

नवी दिल्ली – केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी कोळसा खात्यात कोळसा माङ्गियांची मोठी ढवळाढवळ चालते, ती अजूनही सुरू आहे अशी कबुली दिली. अद्यापही हे खाते कोळसा माङ्गियांपासून मुक्त झालेले नाही आणि आगामी दहा ते वीस वर्षे तरी ते तसे मुक्त होईल की नाही याबाबत शंका वाटते, असेही कबुल केले. अलाहाबाद येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परत जाताना ते पत्रकारांशी बोलत होते.

कोळसा खाण भ्रष्टाचारात गुन्हा दाखल झालेले माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांनी २००५ साली पंतप्रधानांना पत्र लिहून कोळसा माङ्गियांच्या कारवायांबद्दल त्यांना जागृत केले होते. त्यावेळी कोळसा मंत्री म्हणून शिबू सोरेन काम पहात होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोळसा खाते हे कोळसा माङ्गियाकडूनच चालवले जात आहे असे पारख यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. या गोष्टी काल उघड झाल्या. पारख यांच्या पत्राच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी श्रीप्रकाश जैस्वाल यांना कोल माङ्गियांबद्दल प्रश्‍न विचारला होता तेव्हा त्यांनी ही कबुली दिली.

२००५ साली शिबू सोरेन यांना एका खून खटल्यात शिक्षा झाली. त्यामुळे त्यांना हे खाते सोडावे लागले आणि त्यांच्या कामाचा भार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपल्याकडे घेतला. पंतप्रधानांच्या काळातही कोल माङ्गियांची ढवळाढवळ सुरूच राहिली आणि आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पारख यांनी केलेला गौप्यस्ङ्गोट आणि श्रीप्रकाश जैस्वाल यांनी दिलेली कबुली या प्रकारांनी भारतीय जनता पार्टीचे नेते सावध झाले आहेत.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आता सीबीआय समोर जाण्याची तयारी दाखवलेली आहे. तेव्हा तिथे जबानी देताना पंतप्रधानांनी कोळसा खात्यामध्ये कार्यरत असलेल्या कोळसा माङ्गियांची नावे सांगावीत, असे आवाहन भाजपाच्या नेत्यांनी केले आहे.