जपानला भू‍कंपाचा धक्का्

टोकियो : जपानच्या पूर्व किना-याला भूकंपाचा तीव्र धक्काा बसला आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे २.१० मिनिटांनी हा झटका जाणवला. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय संशोधन खात्याकडे या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाच्या धक्कयानंतर जपान सरकारने सुनामीची शक्यता वर्तवली आहे.

भूकंप केंद्रापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी टोकियोलाही भूकंपाचे धक्के जाणवले. भुकंपानंतर जपानच्या आपत्कालीन विभागाने होन्शू भागाला त्सुनामीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नागरिक सुनामीची झळ पोहचू नये म्हणून सुरक्षीत जागेचा आसरा घेत आहेत.

भूकंपाच्या धक्क्यानंतर फुकुशिमा अणूकेंद्र रिकामे करण्यात आले आहे. या भूकंपात किती हानी झाली, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. गेल्या महिन्याभरापासून जपानच्या पूर्व किना-याला बसलेला भूकंपाचा हा दुसरा मोठा धक्का आहे.

Leave a Comment