
मुंबई – आमीरखान त्याच्या पालीहिल वरील नवीन घरात दिवाळीची जंगी पार्टी देण्याच्या तयारीत असून त्याची निमंत्रणेही रवाना झाली असल्याचे समजते. या पार्टीला आमीरने धूम तीन या त्याच्या नव्या चित्रपटातील सहनायिका अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांना खास आमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चन, राकेश मेहरा, राजू हिरानी आणि सलमान खानलाही आमंत्रण दिले गेले आहे.
