शामी अहमदचा घेतला पाहुण्यांनी धसका

रांची – रांचीतील चौथा वनडेचा सामना पावसात वाहून गेला. या सामन्यात टीम इंडियाचा युवा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शामी अहमदचा यांनी वेगळीच छाप सोडली आहे. त्याच्या गोलंदाजीचा धसका पाहुण्यांनी घेतला आहे. शामीकडे दुर्लक्ष करू नका. आगामी सामन्यात त्याला जपून खेळण्याचे आवाहन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने त्याच्या सहका-यांना केले आहे.

शामीच्या अचूक मा-याने टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी सुखावला आहे. त्याने त्याची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानविरुद्ध जानेवारी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शामीने १२ वनडेत १३ विकेट घेतल्या आहेत. रांचीतील कामगिरी त्याची आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. आगामी काळात त्यांजनी जर असाच मारा केला तर आगामी काळात टीम इंडियाला गोलंदाजीकडे फारसे लक्ष द़यावे लागणार नाही.

याबाबत बोलताना आस्ट्रेलियाचा कर्णधार जार्ज बेली म्हणाला ‘‘शामीने नव्या चेंडूचा सुरेख वापर केला. त्याने चांगला वेग राखला. तसेच चेंडू स्विंगही केले. खेळपट्टीचा चांगला उपयोग करवून मारा केल्याने शामी अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी ठरला. त्याच्यासारखी गोलंदाजी यापूर्वी मालिकेत आम्हाला पाहायला मिळाली नाही. उर्वरित तीन लढतींमध्ये शामी खेळणार असल्याने आम्हाला वेळीच सावध व्हावे लागेल. शामीच्या गोलंदाजीचा अभ्यास करताना आमच्या सर्वच फलंदाजांना त्याच्याविरुद्ध खेळताना विशेष काळजी आगामी काळात घ्यावी लागणार आहे.

रांची वनडेत ऑस्ट्रेलियाने २९५ धावा केल्या तरी फॉर्मात असलेल्या त्यांच्या तीन प्रमुख फलंदाजांना शामीने लवकर माघारी धाडले होते. त्यामुळे आठव्या षटकांत पाहुण्यांची अवस्था ३ बाद ३२ धावा अशी झाली होती. भुवनेश्वर कुमारच्या जागी मिळालेल्या संधीचा फायदा उठवताना शामीने अचूक मारा करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला हादरे दिले. त्यामुळे यातून सावरण्यासस ऑस्ट्रेलियाला बराच कालावधी लागला.

Leave a Comment