मराठा आरक्षण: जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार

औरंगाबाद- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या बैठका झाल्या आहेत. या सर्व निवेदनांचा सखोल अभ्यास करून जानेवारीपर्यंत अहवाल सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे दिली.

राज्यातील मराठा समाजाला इतर मागास या प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्यासंदर्भात मराठवाडय़ातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी राणे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण समितीची बैठक, सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या वेळी विविध शिष्टमंडळांकडून निवेदने स्वीकारण्यात आली. एकूण ९०२ निवेदने समितीकडे प्राप्त झाली. त्यातील ७१३ अर्जदारांनी आरक्षण देण्याची मागणी केली आहे, तर ९ अर्जदारांनी विरोध केला आहे. ३२ अर्जदारांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे अशी सूचना केली आहे, तर ८१ जणांनी आरक्षणाची काय गरज आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

यावेळी वार पडलेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, राज्यमंत्री सुरेश धस, अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीना आणि या समितीचे सदस्य सचिव परिहार यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment