अभिनेता आदित्य रॉय कपूरने ‘आशिकी-२’ मध्येग चांगले काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रत्यक्षात, ‘आशिकी-२’ या सिनेमाने खूपच चांगली कमाई केली. या सिनेमातील चांगल्या कामगिरीमुळेच अदित्यकला आगामी काळात कैटरिना कैफचा नायक म्हणून काम करण्या ची संधी मिळाली आहे. त्याआमुळे सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर भलताच खूश आहे.
अदित्याला या सिनेमाची लॉटरी लागली आहे ती सुशांत सिंग राजपूतमुळे. सुशांतने तारखांअभावी अभिषेक कपूरच्या ‘फितूर’वर ‘पानी’ सोडले आणि ती भूमिका आदित्यच्या वाटय़ाला आली. आदित्य पहिल्यांदाच प्रस्थापित नायिकेबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुशांतच्याही आधी आदित्य रॉय कपूरने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्याने दोनदा ऐश्वर्या रॉय बच्चनसारख्या प्रस्थापित अभिनेत्रीबरोबर काम केले आहे. पण, नायक म्हणून त्याने ऐश्वर्याबरोबर काम केले नव्हते.
‘आशिकी २’ त्याच्याकडे येईपर्यंत त्याने चांगल्या बॅनरच्या सिनेमाबरोबर काम केले, पण तो नेहमी सहाय्यक भूमिकांमध्येच अडकू न पडला. अगदी ‘यह जवानी है दिवानी’ या सिनेमातही त्याने रणबीरच्या मित्राची भूमिका केली होती. ‘आशिकी २’ मध्ये नवोदित श्रध्दा कपूरबरोबर त्याचे सूर जुळले एकूणच या सिनेमाच्या यशाचा त्याला फायदा झाला. त्यामुळे सुशांत जेव्हा ‘फितूर’ मधून बाहेर पडला तेव्हा त्याच्यासारख्याच फ्रेश चेह-याला संधी मिळाली. आदित्यसाठी हा सिनेमा म्हणजे लॉटरीच असली तरी त्याला कैटरिनाबरोबर प्रेमकथेचा नायक म्हणून पाहण्याची कल्पना तशी प्रेक्षकांना पचवणे अवघडच आहे. त्यारमुळे आगामी काहत येत असलेल्या या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.