आपोआप रिचार्ज होणार मोबाईल

व्हेंडरबिल्ट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कांही क्षणात मोबाईलची बॅटरी आपोआप रिचार्ज होऊ शकेल व दीर्घकाळ टिकेल अशा सुपर कपॅसिटरचा शोध लावला आहे. यामुळे मोबाईल बॅटरी तंत्रज्ञानात नवी क्रांती होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

या विद्यापीठातील संशोधक शास्त्रज्ञ कॅरी पिंट व त्यांच्या सहकार्यांीनी त्यासाठी सिलिकॉनचा वापर केला आहे. त्यामुळे हा कपॅसिटर सध्या ज्या ज्या उपकरणात सिलीकॉन चीपचा वापर केला जातो त्यासर्व उपकरणांचे चार्जिंग करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मोबाईल्स, सेन्सर व अन्य इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हायसेस साठी तो उपयोगी ठरेल व त्यांच्या उत्पादनासाठी येणार्‍या खर्चातही त्यामुळे मोठी बचत होईल असे पिट यांचे म्हणणे आहे.

सिलीकॉनपासून बनविलेल्या कपॅसिटरपासून निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन हा कपॅसिटर बनविताना सिलीकॉन वेफर्सच्या सच्छीद्र मटेरियलच्या पृष्ठभागावर कार्बनचा थर दिला गेला आहे आणि ते फर्नेस मध्ये तापविले गेले आहे असे सांगून पिट म्हणाले की यामुळे सध्या बॅटरीवर चालणार्यान उपकरणांची एनर्जी रासायनिक प्रक्रेयेतून बॅटरीत साठविली जाते त्याऐवजी ती थेट सच्छीद्र पृष्ठभागावरच साठविली जाते व यामुळे एका क्षणात मोबाईल व तत्सम उपकरणे चार्ज होतात व हा चार्ज दीर्घकाळ टिकतो.

Leave a Comment