विनोद कांबळीला विदेशी महिलेकडून वर्णभेदी शिवीगाळ

मुंबई – माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला एका विदेशी महिलेने वर्णभेदी शिवीगाळ केली आहे. ही विदेशी महिला त्याच्याच सोसायटीत राहते. कार पार्किंग करण्याच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला.

या प्रकरणी विनोद कांबळीने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या महिलेने आपल्याला उद्देशून ब्लॅक इंडियन’ असे वर्णद्वेषी शब्द उच्चारले, असे कांबळीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. माझी खूप ओळख आहे, तुला बघून घेईन’ अशी धमकीही त्या महिलेने आपल्याला दिल्याचे कांबळीने सांगितले.

अथिती देवो भव:’ असे म्हणत आपण परदेशी नागरीकांची आदर करतो. मात्र आपल्याच देशात येउन जर कुणी अशा प्रकारे अपमान केल्यास ते योग्य नसल्याचे मतही कांबळी याने व्यक्त केले.

Leave a Comment