मुंबई: सोसायटीतील एका परदेशी महिलेविरोधात वर्णभेदाची तक्रार माजी कसोटीपटू विनोद कांबळीने पोलिस ठाण्या त दाखल केली आहे. पार्किंगच्या कारणावरुन झालेल्या भांडणात महिलेने वर्णभेदात्मक शब्दांचा वापर केल्याचे कांबळीचे म्हणणे आहे.
विनोद कांबळीची परदेशी महिलेविरोधात वर्णभेदाची तक्रार
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास विनोद कांबळी राहत असलेल्या सोसायटीत हा प्रकार घडला. विनोद कांबळीने या प्रकरणी बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बांद्रा पोलीस शुक्रवारी या महिलेची विचारपूस करुन पुढील कारवाईची दिशा ठरवतील. पार्किगच्या कारणावरून जरी दोघात वाद झाला असला तरी याबाबत महिलेनी पोलिस ठाण्यांत तक्रार दिलेली नाही.
दरम्यान, हा निव्वळ माझा अवमान नसून संपूर्ण देशाचा अवमान असल्याने या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी विनोद कांबळीने केली आहे. या प्रकरणची चौकशी पोलिस करीत असून चौकशीनंतरच काय कारवाई केली जाणार हे स्पष्ट होणार आहे.