कुख्यात गुंड नितू दाबोदियाचा एनकाऊंटर

नवी दिल्ली- कुख्यात गुंड नितू दाबोदिया याचा गुरुवारी रात्री राजधानी दिल्लीत एनकाऊंटर करण्यात आला. नितू याच्यावर खून, दरोडा, खंडणी वसुल करण्यासारखे 50 हुन अधिक गंभीर गुन्हे नोंद होते.

नितू आपल्या दोन मित्रांसोबत वसंतकुंज परिसरात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी येथे सापळा रचला होता. मात्र नितूला हे कळताच त्याने पोलिसांच्या गाडीला टक्कर मारली आणि त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.

त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळीबार करण्यास सुरवात केली यात नितू जखमी झाला. नितूला उपचाराकरीता रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Leave a Comment