रांचीतील धोनीच्या घरावर दगडफेक

रांची – भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्या रांचीतील राहत्या घरावर अज्ञात लोकांनी रात्री साडेनऊच्या सुमारास दगडफेक केल्याची घटना घडली. यात धोनीच्या घराच्या काचा फुटल्या असल्याचे समजते. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुरूवारचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला तेव्हाच ही घटना घडली.

या वेळी धोनीच्या घरातील सर्वच व्यक्ती सामना पाहण्यासाठी जेएससीएस आंतरराष्टीय स्टेडियमवर गेल्या होत्या त्यामुळे घरात कुणीच नव्हते. परिणामी दगडफेक नक्की कुणी केली याचा तपास लागलेला नसला तरी त्याचा मॅचशी कांही संबंध नसावा असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. घरावर लावलेल्या सीसीटिव्हीचे फूटेज तपासल्यानंतरच पोलिसांत तक्रार नोंदविली जाईल असे धोनीचे मेहुणे गौतम गुप्ता यांनी सांगितले.

Leave a Comment