मुंबईत पुन्हा गँगवॉरची चाहुल?

मुंबई – एकेकाळी अंडरवर्ल्डमधील गँगवारमुळे त्रस्त झालेल्या पण आता असल्या वॉरपासून मुकती मिळालेल्या मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्डमधील गँगवारचे मळभ दाटून येऊ लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. परिणामी मुंबईतील वातावरण सध्या गरम असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद व त्याचा प्रतिस्पर्धी छोटा राजन या दोघांनीही मुंबईवर पुन्हा आपला ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पाकिस्तानात आश्रयास असलेल्या दाऊदची टोळी मुंबईत कांही काळ अज्ञातवासात आहे. मात्र नुकतेच दाऊदने मुंबईतील आपला कारभार पुन्हा सुरू करण्यासाठी आपले दोन भाऊ मुस्तकीन आणि हुमायून यांना मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी कोणताही बेकायदेशीर धंदा केला नाही तरी मुंबईत ते दाऊदचे प्रतिनिधी म्हणूनच ओळखले जाणार आहेत व त्यामुळे खंडणी, अपहरणांसारख्या गुन्ह्या दाऊद टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे मुंबईतून दाऊदला पूर्णपणे नामशेष न करू शकलेल्या व आपलीच जरब मुंबईवर असावी अशा प्रयत्नात असलेल्या छोट्या राजनने आपली फुटलेली टोळी पुन्हा एकत्र करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दाऊदचे भाऊ भारतात येण्यापूर्वीच आपली टोळी उभी करायचा त्याचा प्रयत्न आहेच पण दाऊदचे विरोधक असलेल्या अन्य टोळ्यातील लोकांनाही तो आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. दाऊद पुर्या  ताकदीनिशी मुंबईत उतरण्याच्या प्रयत्नात आहे तर राजन त्याची ही खेळी यशस्वी होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे.

परिणामी दाऊदचा आपला वसुली व्यवसाय पुन्हा उभारण्याचा प्रयत्न व त्याला उखडण्याचा राजनचा प्रयत्न यातून पुन्हा गँगवॉर होण्याच्या दाट शक्यता आहेत. गुंड टोळ्यांचा त्यांची ताकद हाच एकमेव हुकमी एक्का असतो आणि ताकदीला आव्हान देणारी टोळी असेल तर त्यातूनच गँगवॉर होतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment