पावसामुळे चौथी वनडे रद्द

रांची- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे तब्बल दोन तासांचा वेळ वाया गेल्यानंतर सामना 20 षटकांचा करण्यात होता. तसेच भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे सुधारी आव्हान देण्यात आले आहे. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याआधी वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीने तीन धक्के देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर कर्णधार जॉर्ज बेली आणी ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात आठ बाद 295 धावा केल्या आहेत.

त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीचा हा निर्णय सामीने योग्य ठरवत. ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाजी मोडून काढली. सामीच्या भेदत मा-यापुढे ऑस्ट्रेलियाची अवस्था तीन बाद 32 अशी झाली होती. सात षटकांत दोन बाद 28 धावसंख्या असताना पाऊस आल्याने खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला होता. मात्र खेळ पून्हा सुरु झाला आणि सामीने पून्हा एक झटका दिला.

सामीने आरोम फीच, फिल ह्युज आणि शेन वॉटसन या तिघांना बाद केले. त्यानंतर कर्णधार जॉर्ज बेली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पाचव्या विकेटसाठी 253 धावांची भागीदारी केली. हे दोघेही शतक पूर्ण करतील असे वाटत असतानाच बेली 98 धावांवर बाद झाला. त्याला विनय कुमारने बाद केले. तर त्या पाठोपाठ मॅक्सवेलही 92 धावांवर बाद झाला.

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार यांच्या जागी मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकट यांना घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा पिछाडीवर असलेल्या भारताला आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय आवश्यक आहे.

Leave a Comment