नारायण राणेंचा आघाडी सरकारला घरचा आहेर

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद सर्वांना महितच झाला आहे. तरी पण दोन्ही पक्षाची आघाडी मात्र टिकून आहे. हा सर्व प्रकार घडत असतानाच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘संथ’ कारभारावरच हल्ला चढविला आहे. युतीचे सरकार चालत नव्हते तर पळत होते’, असे राणे म्हणाले तेव्हा त्यांचा रोख पृथ्वीबाबांवरच होता असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राणे यांच्या या नव्यात आरोपामुळे कॉग्रेसमध्येच रणकंदन माजण्याची शक्य्ता आहे.

गेल्याा काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडीतील दोन्ही पक्ष एकमेकांवर चिखलफेक करतच असतात. चिखलफेक करण्याहची एकही संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही. कधी झेडपी निवडणुकीत वेगळा संसार थाटण्यावरून तर कधी अधिकारातील हस्तक्षेपावरून आघाडीतील बिघाडी उघड होत असते. आगामी निवडणुकीतील जागावाटपावरून सुरू असलेली हमरीतुमरी हे ताजे उदाहरण आहे. आघाडीतल्या झोलझालमध्ये आता नारायण राणे यांनी झेंडा रोवला आहे.

एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उद़योग मंत्री नारायण राणे यांनी पृथ्वीराजांच्या ‘संथ’ कारभाराला निशाणा बनवले. राणे म्हणाले, ‘सरकारी अधिका-याकडून काम करून घेण्याचे कौशल्य तुमच्याकडे असावे लागते. युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना १०० दिवसांत १५० निर्णय घेतले होते त्यावेळी सरकार चालत नव्हते तर पळत होते. राणे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. सरकारच्या कारभारावर टीका तर केलीच पण मुख्यमंत्री निर्णय घेण्यास काचकूच करतात, असेही त्यांचे नाव न घेता सांगून टाकले. कार्यक्रमानंतर आघाडीतील गोंधळाची चर्चा अधिक होती.

Leave a Comment