ग्रंथींचा असमतोल ; पाचपट वाढ

भारतातील महिलांमध्ये शरीरातल्या विविध ग्रंथींच्या असमतोलाचे प्रमाण गेल्या २० वर्षात पाचपटीने वाढलेले आहे. शरीरातल्या विविध ग्रंथी आणि त्यापासून स्रवणारे हार्मोन्स यांचा अभ्यास केला असता. हे कटू सत्य समोर आले आहे. शरीरातल्या विविध ग्रंथींचे नियंत्रण करणार्‍या महाग्रंथींना एंडोक्राईन असे म्हटले जाते. आपल्या शरीरातल्या विविध प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया या विविध ग्रंथींमुळे होत असतात. या ग्रंथींचे प्रमाण कमी जास्त झाले आणि त्यापासून स्रवणारे हार्मोन्स असंतुलित झाले की स्त्रियांमध्ये अनेक प्रकाचे विकार बळावत असतात.

आपण आपल्या आसपास नजर टाकली तर लठ्ठ महिलांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. सुखवस्तू राहणीमान, जड अन्न सेवन करणे, चरबीयुक्त पदार्थ खाणे, बैठे काम आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणाची कारणे असल्याचे म्हटले जाते. परंतु हे कोणतेही कारण नसताना एखाद्या महिलेची जाडी विनाकारण वाढत जाते. त्यामागे थायरॉईड ग्रंथींचा असमतोल हे कारण असते. अशाच प्रकारे इतरही काही ग्रंथींच्या असमतोलाचे परिणाम महिलांना भोगावे लागतात. \

विशेषतः प्रसूतीनंतर त्यांच्या ग्रंथींमध्ये खूप फरक पडतात आणि महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. हा सार्‍य जगाचाच प्रश्‍न आहे. परंतु भारतातल्या महिलांमध्ये या असमतोलाचे प्रमाण जगाच्या सरासरीच्या पाचपट आहे. ही चिंतेची बाब आहे. या मागची कारणे काय असावीत यावर महिला आणि प्रसूतीतज्ञ डॉक्टरांच्या संघटनांच्या महासंघाने संशोधन सुरू केले आहे. बदलती जीवनपध्दती, तणाव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषण या गोष्टींमुळे हा असमतोल निर्माण होतो असे या संघटनेचे म्हणणे आहे. आपण वेळेवर उपचार करून हा घात टाळला नाही तर भारताच्या पुढच्या पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतील. असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्यात नुकत्याच झालेल्या एका परिषदेमध्ये या संबंधाने सविस्तर चर्चा झालेली आहे. महिलांमधील ग्रंथींचा असमतोल कसा रोखावा आणि त्यांना या विविध विकारांपासून कसे वाचवावे यावर अनेक तज्ञांनी पुण्यातल्या परिषदेमधे आपले म्हणणे सादर केले. विशेष करून प्रजननक्षम वयातल्या महिलांमध्ये असलेला हा असमतोल तातडीने दुरूस्त करावा लागणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment