गरोदर महिलांची अशीही तपासणी

भारतात दत्तक मातृत्वाचा व्यवसाय फार भरभराटीला येत आहे. ज्याला इंग्रजीत सरोगेट मदरहूड असे म्हटले जाते. स्वत:ला मूल न होणारी दांपत्ये भारतात येऊन भारतीय महिलेच्या पोटात आपले मूल ९ महिने वाढवतात. अशा प्रयोगाला अमेरिकेत २० ते ५० लाख रुपये खर्च येतो. पण भारतात त्याची फी ५ लाखाच्या पुढे जात नाही. भारतात ह्या प्रयोगांची संख्या वाढण्याचे हे तर एक कारण आहे. पण आणखी एक कारण आहे भारतातल्या महिला निर्व्यसनी असतात हे. कारण अमेरिकेत, ब्रिटनमध्ये महिला व्यसनी होत आहेत. त्या पुरुषांच्या बरोबरीने मद्यपान आणि धूम्रपान करायला लागल्या आहेत.

आपल्याला मूल होत नाही म्हणून ते दुसर्‍या महिलेच्या पोटी वाढवण्याचा निर्णय घेतात, पण ती बाई सिगारेट ओढत असेल तर गर्भाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ते जन्मत:च काही आजार घेऊन जन्माला येते. ते टाळण्यासाठी सिगारेट न ओढणारी सोरोगेट मदर शोभावी तर ती सापडणे कठीण. म्हणून भारतात हा प्रयोग केलेला बरा असा विचार करून या प्रगत देशातली दांपत्ये त्यासाठी भारतात येत असतात. कारण भारतात महिलांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण जवळ जवळ नाहीच.

या दोन प्रगत देशातले जाणकार महिलांच्या धूम्रपानाने त्रस्त झाले आहेत. ज्यांना सरोगेट मदरहूडची गरज आहे अशा महिला भारतात येऊन निर्व्यसनी बाईची निवड करू शकतात. पण ज्यांना स्वत:ची मुले होतात त्या महिलांचे काय? त्या सिगारेट ओढत असतील तर त्यांची मुले सदोषच पैदा होणार आहेत. ब्रिटनमध्ये महिला धूम्रपानाचे प्रमाण एवढे वाढले आहे की, या देशाची पुढची पिढी मातेच्या धूम्रपानाचे विपरीत परिणाम सोबत घेऊनच जन्माला येणार आहे. मग देशाच्या भवितव्याचे काय? म्हणून ब्रिटनमध्ये आता गरोदर महिलांची धूम्रपानाची वेगळी चाचणी घेतली जायला लागली आहे.

अशी महिला धूम्रपानाच्या आहारी गेली असेल तर तिने धूम्रपान सोडावे यासाठी एक स्वतंत्र समुपदेशनाचा कार्यक्रम राबवला जातो. अशा चाचणीच्या बाबतीत स्वत: महिला मात्र बेफिकीर आहेत. त्या धूम्रपान करीत नाहीत असे खोटेच सांगतात. अशा वेळी त्यांना कार्बन मोनॉक्साईडची चाचणी द्यावी लागते. त्या चाचणीत सत्य लपून रहात नाहीत. ब्रिटनमध्ये २१ टक्के महिला धूम्रपान करतात. त्यांची मुले कमी वजनाची असतात आणि जन्मभर अशक्त असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment