झाशीतील मोदीच्या सभेसाठी मध्यप्रदेशातून गर्दी

लखनौ- कानपूर येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी झालेल्या सभेसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, २५ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील झाशी या ठिकाणी होत असलेल्या भाजपच्या सभेसाठी गर्दीची वानवा होण्याची शक्यता आहे. त्याामुळे सभेच्या आयोजकांनी तत्परतेने यावरही तोडगा काढला आहे. शेजारील मध्य प्रदेशमधील नागरिकांना मोठ्या संख्येने गोळा करून झाशीच्या सभेसाठी आणण्यात येणार आहे.

कानपूर सभेसाठी भाजपकडून चार लाखांवर नागरिक उपस्थिती लावणार असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षामध्ये सुमारे १.२५ लाखांचा जमाव या सभेमध्ये होता. आता झाशीच्या सभेसाठी भाजपकडून दोन लाख लोक एकत्र आणण्याचा संकल्प सोडण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजत. मध्य प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक कार्यकर्ते मोदींचे भाषण ऐकण्यासाठी झाशी येथे जाणार आहेत. मध्यगप्रदेश व झाशीमधील अंतर २५ किलो मीटर आहे.

मोदींच्या झाशी येथील भाषणाचा मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चित फायदा होणार आहे, असे मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते विजेंद्रसिंग सिसोदीया म्हणाले.
भाजपच्या तिकीटावर मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार तयार आहेत. या उमेदवारांपैकी जे २५ ऑक्टोबरला झाशी येथे होत असलेल्या सभेसाठी मध्य प्रदेशमधून लोकांना मोठ्या संख्ये२ने घेऊन जातील त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे,” असे भाजपच्या उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागाचे अध्यक्ष बाबूराम निशध यांनी सांगितले.

Leave a Comment