लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी ठरले व त्यांना पाच वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ठोठावलेल्या आमदार आणि खासदारांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्या आधारे लालूंची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी ठरल्यायने पाच वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा ठोठावलेल्या आमदार आणि खासदारांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होते. त्यानुसार मंगळवारी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी मंगळवारी त्यांची खासदारकी रद केल्याची घोषणा केली.

दरम्यान, सोमवारीच एमबीबीएस’ प्रवेश घोटाळ्य़ात दोषी ठरलेले माजी केंद्रीय व काँग्रेसचे राज्यसभा सदस्य रशीद मसूद यांची खासदारकीही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता या नवीन कायदा नुसार लालूप्रसाद यादव यांचा नंबर लागला आहे.

Leave a Comment