देशात शरीया स्थापन करायचा होता – भटकळ

नवी दिल्ली – अनेक बॉम्बस्फोटात सहभाग असणारा आणि नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहीदीनचा म्होरक्या यासिन भटकळ चौकशी दरम्यान अनेक नवनवे गौप्यस्पोट करत आहे. इंडियन मुजाहीदीन अल कायदा स्टाइलने आपले जाळे पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र लिट्टेपेक्षा ही संस्था वेगळी आहे असेही भटकळने म्हटले आहे. लिट्टे आयएसआयचे अंधानुकरण करत असल्याचेही भटकळने सांगितले.

हवाला मार्फत हैदराबाद स्फोटांसाठी पैसा गोळा करणा-या यासिन भटकळने आता पोलिसांना आणखीन नवीन माहिती दिली आहे. पंधरा दहशतवादी कारवायांमध्ये भटकळ सक्रीय होता. चौकीशीदरम्यान आता तो नवनवे खुलासे करत आहे. भटकळच्या म्हणण्यानुसार इंडियन मुजाहिदीनला भारतात शरीया स्थापित करायचा होता. अफगाणिस्तान आणि सोमालियात इस्लामी दहशतवादाला अल कायदाची भूमिका प्रमुख मानण्यात येते. हे इंडियन मुजाहिदीनचे अत्यंत महत्वाचे मिशन होते. डॉक्टर आफिया सिद्धीकीला अमेरीकेने कुख्यात दहशतवादी म्हणून घोषित केले होते. 9/11च्या कटात सहभागाचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.

जुलै 2008 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तिला अटक करण्यात आली होती. कैदी नंबर 650 म्हणून ही महिला दहशतवादी अमेरीकेत लोकप्रिय आहे.या महिलेला सोडवण्यासाठी इंडियन मुजाहिदीनने ज्यू धर्माच्या लोकांना ओलीस ठेवण्याची योजना आखली होती. बाटला हाऊस संघर्षानंतर इंडियन मुजाहिदीनचे बहुतेक दहशतवादी भारत सोडून इतर ठिकाणी वास्तव्यास गेले होते. त्यापैकी एक आमिर रेझा खान याचे काम नेपाळमधल्या इंड़ियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना सर्व सुविधा पुरवण्याचे होते. मात्र, तो त्यात अपयशी ठरला. इंडियन मुजाहिदीनच्या नेतृत्वासाठी गेले काही महिने इक्बाल आणि रियाझ भटकळमध्ये संघर्ष सुरू होता.

Leave a Comment