थायलंडमध्ये ड्रॅगन ट्रीच्या नव्या प्रजातीचा शोध

बँकॉक – थायलंड मधील शास्त्रज्ञाना येथे अतिशय लोकप्रिय आणि शुभ मानल्या जाणार्या् ड्रॅगन ट्री या झाडाची नवी प्रजाती शोधण्यात यश आले आहे. ड्रॅसीना कावीसाकी असे त्याचे नामकरण करण्यात आले असून या झाडाच्या फांद्या १२ मीटरपर्यंत विस्तारू शकतात तसेच याचे खोड १२ मीटरपर्यंत उंच वाढू शकते. तलवारीच्या आकाराची, पांढर्याो किनारीची पाने आणि क्रिम फुलांना गडद केशरी रंगाच्या पाकळ्या ही याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत.

कॅनरी आयलंड मध्ये आढळणार्याश ड्रॅगन ट्री- ड्रासीना ड्रॅकोशी या प्रजातीची नाळ जुळलेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे झाड अतिशय महत्त्वपूर्ण असून ते थायलंडमध्ये तरी चुनखडीचे डोंगर, पर्वत व त्यातही बुद्धीस्ट मंदिरात प्रामुख्याने आढळते. या झाडाचा वापर थायलंडमध्ये फुलशेतीसाठीही केला जातो कारण त्याला खूप फांद्या येतात. मात्र सर्वसामान्य लोकांत हे झाड पवित्र, घरात भाग्य आणणारे म्हणून अधिक लोकप्रिय आहे.

Leave a Comment