अंजेलिना जोलीला आत्मचरित्रासाठी १८० कोटी रूपये मानधन

हॉलिवूडची लोकप्रिय व ऑस्कर विजेती अभिनेत्री अंजेलिना जोली हिला प्रकाशकाने तब्बल ३ कोटी डॉलर्स म्हणजेच १८० कोटी रूपये देण्यासंबंधीचा करार केला असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे.३८ वर्षीय जोलीचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यासाठी तीन प्रकाशकांत स्पर्धा लागली होती.

जोलीच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑस्कर विजेत्या अभिनेत्री नेहमीच आत्मचरित्र लिहू इच्छितात. जोलीसाठी सध्याची वेळ अतिशय योग्य आहे. तिचे जगभरात अब्जावधी चाहते आहेत आणि त्यामुळे या आत्मचरित्राची विक्री जोरदार होणार यात शंका नाही. ज्या प्रकाशकाने हे हक्क मिळविले आहेत, त्याच्या हाती सोन्याची खाणच लागली आहे असे म्हणता येईल. त्याने खर्च केलेली रक्कम कांही आठवड्यातच वसूल होईल असा विश्यासही व्यक्त केला जात आहे.

जीन्समधून आलेला कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी जोलीने गेल्या वर्षी आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकले होते व त्यामुळेही ती चर्चेच होती. जोली संयुक्त राष्ट्राची सद्भावना दूत म्हणूनही काम करते आहे. हॉलिवूडमध्ये तिची ओळख परिश्रम घेणारी अभिनेत्री अशी आहे.