नजरचुकीने लिक झाली गुगल नेक्स ५ ची छायाचित्रे

गुगलच्या नव्या नेक्स पाच स्मार्टफोनची छायाचित्रे नजरचुकीने वेबवर प्रसिद्ध झाल्याची घटना घडली असून ही छायाचित्रे फोनच्या किंमतीसह दिसल्याने कांही काळ उत्सुकतेचे वातावरण तयार झाले होते. गुगलने आपला हा नवा स्मार्टफोन अधिकृतरित्या सादर केलेला नाही मात्र अँड्राईड पोलिसच्या प्ले स्टोअरमध्ये हे चित्र वेबवर दिसले. अर्थात या चुकीची दुरूस्ती त्वरीत करण्यात येऊन हे चित्र वेबवरून काढून टाकण्यात आले असले तरी या फोनच्या किमतीच्या टॅगसह ते कांही वेळासाठी दिसले आणि त्या काळात त्याचा फोटोही काढला गेला असल्याचे समजते.

या फोटोमुळे जगातील अनेक उत्सुकांना गुगलचा हा नवा हँडसेट कसा दिसतो हे समजलेच पण त्याचबरोबर प्रथमच अँड्राईड किटकॅट ४.४ चेही दर्शन मिळाले. हा नवा फोन नेक्सस ७ टॅब्लेट प्रमाणेच असून तशीच रबर बॅकही त्याला आहे. गुगलचा लोगो त्यावर मुद्रांकित केलेला आहे व  अँड्राईड किटकॅट  आयकॉन त्यावर स्पष्ट दिसतो आहे. एसएमएस अॅपच्या जागी गुगल हँडआऊटस दिसते आहे व फोनची किमत आहे ३४९ डॉलर्स. म्हणजेच हा नेक्स पाच सर्वसामान्यांना सहज परवडणार्याक किमतीत उपलब्ध होणार आहे. गुगलने या संदर्भात कोणतही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी हा फोन हे वर्ष संपण्यापूर्वी बाजारात दाखल होईल असेही वृत्त आहे.

Leave a Comment